© 2023 आउटलिव | सेवा की शर्तें | गोपनीयता धोरण
स्वतःचे मानसिक आरोग्य जपण्यासाठी उपयोगी येणारे मार्ग
तुम्ही पुरेशी झोप व नियमित पौष्टिक आहार घेत आहात, आणि जे केल्याने तुम्हाला शांत वाटतं त्या गोष्टी तुम्ही करता आहात याकडे लक्ष ठेवा. (उदाहरणार््थ, फिरायला जाणे, ध्यान करणे, संगीत ऐकणे इत्यादी)
स्वतःचा सगळा वेळ आपल्या प्रिय व्यक्तीला आधार देण्यासाठी देऊ शकला नाहीत तर त्याबद्दल अपराधी वाटण्याची गरज नाही. तुमच्या स्वतःच्या गरजा पूर््ण करणे हेही महत्त्वाचे आहे. असे मार््ग शोधा की त्यामुळे ज्या गोष्टी करण्यात तुम्हाला आनंद मिळतो त्या तुमच्या रोजच्या दिनचर्येत सामील करू शकाल.
तुमचे कुटुंबीय/मित्र ह््याांना नियमित भेटत जा. अशा गोष््टीींमध्ये सहभागी व्हा ज्या इतरांशी जोडलेले राहण्यात तुमची मदत करतील आणि तुम्हाला ही जाणीव होईल की लोकं तुमच्यावर प्रेम करतात.
स्पष्ट करा की तुम्ही कशा प्रकारचा आधार किती काळ देऊ शकता. तुम्हाला ह्या सर््वाांमुळे दडपण येऊ लागले तर त्या व्यक्तीच्या सपोर््ट नेटवर््कमधील इतरांची तुम्ही मदत घेऊ शकता.
काही वेळा शक्य ते सर््व प्रयत्न वा आधार देऊन सुद्धा, त््याांच्या परिस्थितीत सुधारणा होत नाही किंवा सुसाइडने त््याांचा मृत्यू देखील होऊ शकतो. अशा प्रसंगी स्वतःला दोषी आणि सर््वस्वी जबाबदार ठरवणे या सारख्या भावना येऊ शकतात. काही भावना योग्य आणि काही अयोग्य असे काही नसते, परंतु घडलेल्या घटनेसाठी तुम्ही स्वतःला दोषी न धरणे महत्त्वाचे आहे. लक्षात असू द्या की त्या व्यक्तीच्या जीवन आणि निर््णय ांसाठी तुम्ही जबाबदार नाही.
तुमच्या भावनांबद्दल एखाद्या आरोग्य तज्ञाशी [डॉक्टर, काऊन्सलर, थेरपिस्ट (उपचार तज्ञ)] बोलून पुढे जाण्याचे मार््ग शोधा. एखादा पियर (समवयस्क) आधार गटात सामील होऊन अशांच्या संपर््ककात राहा ज्याचे अनुभव तुमच्यासारखे आहेत.
Feedback helps us improve our content and resources to make the experience better for everyone.