© 2023 आउटलिव | सेवा की शर्तें | गोपनीयता धोरण
सुसाइड मागची कारणे काय आहेत आणि चेतावणी चे चिन्हे काय आहेत ते ओळखा
सुसाइड रोखण्याविषयी आपण बोलणे का आवश्यक आहे?
सुसाइड आणि सुसाइड आयडीएशन (सुसाइडची कल्पना करणे) म्हणजे काय?
सुसाइडच्या धोक्याचे संकेत कोणते?
एखाद्या व्यक्तीच्या मनात सुसाइड करण्याचे विचार आणि भावना का येत असाव्यात?
एखाद्या व्यक्तीच्या मनात सुसाइड करण्याचे विचार आणि भावना कि ती काळासाठी राहू शकतात?
मदत कुठे उपलब्ध आहे?
भारतात सध्या 15-29 वर्षे वयोगटातील तरूणांमध्ये सुसाइड हे मृत्यूचे प्रमुख कारण आहे. मात्र सुसाइड रोखल्या जाऊ शकतात व योग्य कौशल्य असलेले कोणीही, ते रोखण्याच्या प्रयत््नाांत सहभागी होऊ शकते ज्यामुळे एखाद्याच्या आयुष्याचा मार््ग बदलू शकतो.
चुकीची माहिती, कलंक आणि आधार सेवांविषयी माहितीचा अभाव ह्या गोष्टी, तरुणांना योग्य वेळी तो आधार किंवा निगा मिळण्यात अडथळे ठरत आहेत. सुसाइड आणि सुसाइड रोखणे ह्या विषयांवर मुक्त संवाद होण्यासाठी मंच तयार करणे, हे सुसाइड योग्यरित्या रोखण्याच्या दिशेने पहिले महत्त्वाचे पाऊल आहे.
स्वतःचे जीवन संपविण्यासाठी केलेली क्रिया म्हणजे सुसाइड.
सुसाइड आयडीएशन म्हणजे स्वतःचे जीवन संपविण्याचा विचार, वा त्यासाठी विशिष्ट पद्धतींचा विचार करणे किंवा स्वतःचे आयुष्य संपवण्याची स्पष्ट योजना (प्लान) तयार करणे.
एखादी व्यक्ती सुसाइडचे विचार आणि भावना अनुभवत असेलही तरी त्यानुसार वागेलच असे नाही. अशा भावनांचा अनुभव हा प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळा असतो. तुम्ही भावनिक दुःख किंवा यातनांनी जर ग्रासलेले असाल तर सुसाइड हा एकच सुटकेचा मार््ग आहे असे तुम्हाला कदाचित वाटू शकते. परंतु अशा भावना कायम रहात नाहीत. परिस्थिती सुधारून तुम्हाला जगण्याची प्रेरणा पुन्हा मिळू शकते. लक्षात असू द्या की तुम्ही एकटे नाही आहात आणि तुमच्यासाठी आधार उपलब्ध आहे!
धोक्याचे संकेत म्हणजे एखादी व्यक्ती सुसाइड करण्याची शक्यता आहे (तत्काळ किंवा नजीकच्या काळात) हे दर््शवणारी चिन्हे. अनेक सुसाइड घडण्याआधी, त्या व्यक््तीींच्या बोलण्यात वा वागण्यात धोक्याचे संकेत दिसलेले असतात.
धोक्याचे संकेत लक्षात घेणे आणि त््याांसाठी सतर््क राहणे महत्त्वाचे आहे. असे केल्याने एक जीव वाचवण्यासाठी मदत होईल - तुमचा कि ं वा इतर कोणाचा.
बोलण्यातील लक्षणे:
जर ती व्यक्ती बोलत असेल कि:
वागण्यातील लक्षणे:
जर त््याांच्या वागण्यात दिसून येते
भावनिक लक्षणे:
जर त््याांच्यात दिसून येत असेल :
कोणतेही वय, जेेंडर वा बॅकग्राउंड असलेल्या व्यक्तीला सुसाइड करण्याचे विचार भेडसावू शकतात. बहुतेक वेळा, कोणतेही एक कारण (उदाहरणार््थ: परीक्षेतील अपयश) सुसाइड का होते ह्याचे उत्तर स्पष्टपणे देऊ शकत नाही. अनेक तणावपूर््ण कारणं किंवा परिस्थिती, निराशेच्या आणि असहायतेच्या भावना निर््ममाण करते, तेव्हा एखादी व्यक्ती आपल्या सुसाइड करण्याच्या भावनेनुसार कृती करण्याची शक्यता असते.
तरीही, काही परिस्थितींमुळे एखाद्या व्यक्तीने सुसाइडचा प्रयत्न करण्याचा धोका अधिक वाढतो. उदाहरणार््थ:
वरील कारणे एखाद्या व्यक्तीस सुसाइडच्या विचारांप्रत नेतील वा तशी वर््तवणुक होईलच असं नाही परंतु त्या कारणांमुळे राग, निराशा, असहायता किं वा अपराधी भावनांची तीव्रता वाढू शकत.े त्यामळु े अशा कारणानं ा समजनू घणे ेआणि धोक्याचे संकेत ओळखणे हे महत्वाचे ठरते.
अशा भावना असण्याचा कालावधि प्रत्येकासाठी वेगवेगळा असू शकतो. असे विचार पुन्हा पुन्हा येऊ शकतात, ते कायम नसतात आणि निघूनही जातात. आधार आणि मदत घेऊन समाधानाने जगणे शक्य असते. आत्मघाताच्या भावना लवकरात लवकर ओळखल्याने त््याांचा सामना करण्यासाठी आधार मिळवणे शक्य होते.
आपत्काल (इमर््ज न्सी) असेल तर:
जर तुम्हाला सुसाइडच्या विचारांनी घेरले आहे परंतु तुम्ही आणीबाणीच्या प्रसंगात (क्रायसिस) नाही आहात तर तुम्ही खालील पर््यया य वापरू शकता:
आधार (सपोर््ट) हेल्पलाईनवर फोन करा फोनवरील काऊंनसलिंग हा तुम्हाला गरज लागेल तेव्हा माहिती आणि आधार मिळवण्याचा सुरक्षित मार््ग आहे. जर तुमच्या ओळखीच्या लोकांशी समोरासमोर व मोकळेपणाने बोलणे तुम्हाला कठिण वाटत असेल तर फोनवर कोणाशी तरी बोलणे उपयोगी ठरू शकते.
मानसिक स्वास्थ्य तज्ञ, जसे की सायकॉलॉजि स्ट कि ं वा काऊंसिलर अपॉईंटमेेंट घ्या तुम्हाला सुसाइड करण्याच्या भावना का सतावत आहेत हे समजून घ्यायला ते मदत करतील. ह्या भावनांचा सामना आणि त््याांचे निराकरण करण्यासाठी तुम्ही स्वतः काय करू शकता हे ते सुचवतील.
तुमच्या स्थानिक डॉक्टर/जनरल प्रॅक्टिशनरला भेटा ते तुमचं म्हणणं ऐकून घेऊन पुढे काय करायला हवे ते ठरवण्यासाठी तुम्हाला मदत करतील. तुमच्या लक्षणांवर उपाय म्हणून ते काही औषधे लिहून देऊ शकतील आणि आवश्यक असेल तर तुम्हाला मानसिक स्वास्थ्य तज्ञाकडे जाण्याचा सल्ला देतील.
समवयस्क (पीयर) आधार ग्रुपची मदत घ्या तुमचे विचार शेयर करण्याकरिता असा ग्रुप हे एक उपयुक्त ठिकाण असू शकते. तुमच्यासारखे अनुभव असणाऱ््ययाांकडून ह्या परिस्थितीचा सामना कसा करावा ह्याविषयी उपयोगी सूचना (टिप्स) इथे मिळू शकतील. तुमची एकटेपणाची भावना देखील कमी होईल.
Feedback helps us improve our content and resources to make the experience better for everyone.