© 2023 आउटलिव | सेवा की शर्तें | गोपनीयता धोरण
हस्तक्षेप
आमचा असा विश्वास आहे की जी सरकारी धोरणे आणि कार्यक्रम तरुणांच्या जीवनावर आणि ते राहत असलेल्या समुदायांवर परिणाम करतात, त्याच्या निर्माण प्रक्रियेत तरुणांचा सहभाग अतिशय महत्वपूर्ण ठरेल. ह्यात सुसाईड प्रतिबंधाचाही समावेश होतो.
‘आउटलिव’ द्वारे तरुणवर्गाशी संपर्क साधला असता असे लक्षात आले की स्थानिक, राष्ट्रीय आणि जागतिक पातळीवरील धोरणांबद्दल असलेले वेगवेगळे दृष्टीकोन हे तरुणांमधील सुसाईड प्रतिबंधासाठी उपयुक्त ठरू शकतात.
युथ अडवोकेट्स हे तरुणांमधील सुसाईड प्रतिबंधात्मक पॉलीसी बनवण्यात सहभागी असलेल्यांना विविध धोरणात्मक उपायांवर लक्ष केंद्रित करण्यास प्रवृत्त करू शकतात.
युथ अडवोकेट्स धोरणकर्त्यांना तरुणांमधील सुसाईड प्रतिबंधाच्या विविध कारणांना संबोधित करणारे कार्यक्रम आणि धोरणात्मक उपायांवर लक्ष केंद्रित करण्यास प्रवृत्त करू शकतात. त्यामध्ये शैक्षणिक क्षेत्रामधील तणाव आणि भेदभाव, सुसाईड प्रतिबंधासंबंधी उपायांचा अभाव, घरगुती हिंसाचार अशा घटकांचा समावेश होतो. तरुणांच्या हक्कांचे संरक्षण आणि समर्थन केले जाईल हे सुनिश्चित करण्याचीही क्षमता ह्यामध्ये आहे.
आउटलिवचा YASP फेलोशिप प्रोग्रॅमचे उद्दिष्ट सुसाईड प्रतीबंधासंबंधी तरुणांना प्रशिक्षण देऊन धोरणात्मक बदल घडवून आणणे आहे तरुणांमध्ये सुसाईड रोखण्यासाठी. एक वर्षाच्या कालावधीमध्ये आउटलिवद्वारे 10 युथ ॲडवोकेट्सना youth advocacy योजना कशी निर्माण करायची आणि अमलात आणायची ह्यावर प्रशिक्षण व मार्गदर्शन दिले जाईल. हे तरुण पुढे जाऊन सुसाईड प्रतीबंधासंबंधी पॉलिसीज तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये धोरणकर्त्यांसह सहभागी होऊन आपल्या समुदायासाठी स्वतःचे योगदान देतील.
एक वर्षाच्या फेलोशिपचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे
आउटलाइव्हच्या YASP फेलोशिपसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला मानसिक आरोग्य किंवा सुसाइडच्या प्रतिबंधाबाबत पूर्वपार्श्वभूमी किंवा पात्रता असण्याची गरज नाही. आम्ही अशा तरुण व्यक्तींचे अर्ज आमंत्रित करत आहोत जे:
निवड प्रक्रिया काय आहे?
टप्पा १: ऑनलाइन अर्ज फॉर्मची सबमिशन
टप्पा २: शॉर्टलिस्टेड उमेदवारांची ऑनलाइन पॅनेल मुलाखत
टप्पा ३: निवडक उमेदवारांचे ऑनबोर्डिंग
मी कसा अर्ज करू शकतो/शकते?
अर्ज फॉर्म येथे भरा - https://forms.office.com/r/i1C9s7guM1
अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०२३ आहे.
तुम्हाला काही प्रश्न असतील, तर कृपया [email protected] वर आमच्याशी संपर्क साधा.