Skip to main content

Main navigation

आउटलिव बद्दल थोडेसे   arrow

आउटलिव काय
आहे?

भारतामध्ये 15 ते 29 वयोगटातील तरुणांचा मृत्यू प्रामुख्याने सुसाईडमुळे होतो असे आढळते. सुसाईड हा वेगवेगळ्या घटकांचा परिणाम आहे ज्यामुळे तरुणांच्या आरोग्यावर परिणाम होतो. तरुणांच्या सुसाईड मागे कोणतेही एक कारण नसले तरी ते रोखण्याचे अनेक मार्ग आहेत.

आउटलिव हा सुसाईड प्रतिबंध कार्यक्रम एकूण चार वर्षांचा (२०२०-२०२४) आहे आणि हा कार्यक्रम सेंटर फोर मेंटल हेल्थ लॉ अँड पॉलिसी, इंडिअन लॉ सोसायटी (ILS), संगत आणि क्विकसॅंड डिझाईन स्टूडीओ ह्यांच्या संयुक्त विद्यमाने आणि कॉमिक रिलीफ (यु के) ह्यांच्या मदतीने तयार झाला आहे.

आउटलिव हा कार्यक्रम दिल्ली, मुंबई आणि पुणे ह्या शहरांमधल्या 18 ते 24 वयोगटातील तरुणांनमधील सुसाईड बाबत समस्या संबोधित करतो, विशेषतः जे सुसाईड, आत्महानी, भावनिक ताण किंवा मानसिक आरोग्य समस्यांना सामोरे गेले आहेत त्यांना, आणि जे वंचित समाजाचे भाग आहेत अश्या तरुणांना समाविष्ट करतो.

interventions
icon

हस्तक्षेप

युथ ॲडवोकसी

आउटलिवची सुसाईड प्रतिबंधात्मक युथ ॲडवोकसी फेलोशिप तरुणांना धोरणकर्त्यांसोबत काम करण्यासाठी प्रोत्साहित करते. ह्यामुळे समुदायांमध्ये सुसाईड प्रतिबंधात्मक योग्य तो बदल घडून येण्यास मदत होईल.

पुढे वाचा   आमच्या कार्यक्रमासाठी अर्ज करा
icon interventions

हस्तक्षेप

पियर सपोर्ट

ज्या व्यक्ती तणावग्रस्त आहेत किंवा सुसाईडचा विचार करत आहेत त्यांना चॅट स्वरूपात भावनिक सहाय्य पुरवण्याचे प्रशिक्षण तरुण स्वयंसेवकांना आउटलिवद्वारे दिले जाते.

पुढे वाचा   आउटलिव चॅटला भेट द्या
icon

हस्तक्षेप

सार्वजनिक
सहभाग

आउटलिव मधून तरुणांची कहाणी समाजापर्यंत पोहोचवले जातात, मल्टीमीडिया रिसोर्सेस (multimedia resources) उपलब्ध करून दिले जातात आणि युवा वर्गासाठी सुसाईड प्रतिबंधात्मक सामाजिक कार्यक्रम, वर्कशॉप्स, सोशल मीडिया (social media) उपक्रम योजले जातात ज्याद्वारे समाजात सुसाईड बद्दल गैरसमज दूर केले जातील.

पुढे वाचा   कॅंपेन बद्दल अधिक माहिती
intervention

संपर्क आणि सहभाग

तुम्हाला स्वयंसेवक व्हायची इच्छा असेल, काही प्रश्न, सूचना असतील किंवा आउटलिवच्या सहयोगाने काम करायचे असेल तर संपर्क साधा: [email protected]

आउटलिवसाठी योगदान

आमच्या न्यूजलेटरला (newsletter)
सबस्क्राईब (subscribe) करा

तरुणांमधील सुसाईड प्रतिबंधासंदर्भात असलेले कार्यक्रम, उपक्रम किंवा संसाधनांची दर आठवडा माहिती देणारे आउटलिवद्वारे सादर केलेले न्यूजलेटर.

हे पान किती उपयुक्त होते?

अभिप्राय आम्हाला आमची सामग्री आणि संसाधने सुधारण्यात मदत करतो जेणेकरून प्रत्येकासाठी अनुभव अधिक चांगला होईल.