आउटलिवमध्ये सहभागी होण्याचे मार्ग
आउटलिवद्वारे भारतीय तरुणांमधील सुसाईड प्रतीबंधाबाबत कार्य करण्यासाठीचे अनेक मार्ग आहेत.
तुमचा एखादा आशावादी अनुभव सांगितला तर सारख्या अनुभवातून जाणाऱ्या लोकांना किंवा सुसाईडचे विचार येत असलेल्या व्यक्तींना सकारात्मक मदत होऊ शकते.
आपली कहाणी आम्हाला सांगाआउटलिवचे उपक्रम व इतर माहिती तुमच्या कॉलेजमध्ये व समुदायामध्ये पसरवून तरुणांमधील सुसाईड प्रतिबंधात्मक कार्यात आमची मदत करावी
जर तुम्हाला सुसाईड प्रतिबंधात्मक कार्य करायचे असेल तर आउटलिव सोबत तणावग्रस्त तरुण व्यक्तींना चॅट बेस्ड भावनिक आधार पुरवता येईल
तुम्ही मानसशास्त्र किंवा मानसिक आरोग्य या विषयात मास्टर्स केले असल्यास, पियर सपोर्टरना मार्गदर्शन आणि पर्यवेक्षण देण्यासाठी आमच्यात सामील व्हा.
तुम्ही आउटलिव संसाधने तुमच्या शाळेत, कॉलेजमध्ये किंवा शेजारात प्रिंट करून शेअर करू शकता, किंवा ती सोशल मीडियावर पोस्ट करून जनजागृती वाढवण्यासाठी मदत करू शकता.
सुसाईड प्रतिबंधाबाबत तुम्ही लिहिलेल्या गोष्टी, काढलेली चित्रे किंवा तुमच्याकडे असलेल्या काही संकल्पना अथवा कौशल्ये आम्हाला सांगा. [email protected] वर आम्हाला मेल करा आणि आम्ही लवकरात लवकर तुमच्याशी संपर्क साधू.
आम्ही दिल्ली, मुंबई, पुणे आणि भारतातील इतर शहरांमध्ये सातत्याने स्थानिक कार्यक्रम आयोजित करतो. इथे क्लिक करा या महिन्यात काय होत आहे ते पाहण्यासाठी.
अभिप्राय आम्हाला आमची सामग्री आणि संसाधने सुधारण्यात मदत करतो जेणेकरून प्रत्येकासाठी अनुभव अधिक चांगला होईल.