फॅसिलिटेटर ट्रेनिंग प्रोग्रामचा उद्देश तरुणांना त्यांच्या समुदायामध्ये आउटलिव जागरूकता सत्रे आयोजित करून युवक सुसाईड प्रतिबंधामध्ये सक्रिय योगदान देण्यासाठी कौशल्ये आणि आत्मविश्वासाने सशक्त करणे आहे.
हे प्रशिक्षण ७ दिवस आणि ४५ तासांपर्यंत चालले आणि यात विविध शिकण्याच्या सत्रांचा समावेश होता. अधिक माहितीसाठी, येथे एफटीपीचे अवलोकन आणि प्रशंसापत्रे पहा- लिंक
तुम्ही कुठल्याही भूमिकेत असलात, विद्यार्थी, शिक्षक अथवा कर्मचारी इ. तुम्ही सुसाईडबद्दल असणारे गैरसमज दूर करण्यात एक महत्वाची भूमिका बजावू शकता. आउटलिव तर्फे सादर केलेली पत्रके तुम्ही इंग्लिश, मराठी आणि हिंदी मध्ये मोफत डाऊनलोड करू शकता.
तुम्ही ती छापून तुमच्या शाळा, कॉलेज अथवा आजूबाजूच्या परिसरामध्ये किंवा सोशल मीडिया वर त्यांचा प्रसार करू शकता ज्यामुळे लोक जागरूक राहतील.
अभिप्राय आम्हाला आमची सामग्री आणि संसाधने सुधारण्यात मदत करतो जेणेकरून प्रत्येकासाठी अनुभव अधिक चांगला होईल.