© 2023 आउटलिव | सेवा की शर्तें | गोपनीयता धोरण
सुसाइडशी संबंधित सामान्य गैरसमज का आहेत व त्याचा पाया कुठे आहे ते समजून घ्या
तुम्ही सुसाइडचा विचार करत आहात का, असे एखाद्या व्यक्तीला विचारले तर ती कल्पना त््याां च्या मनात शिरते का?
जे सुसाइडचा विचार करतात कि ं वा सुसाइडमुळे ज््याां ना मृत्यू येतो, त््याां ना एखादा मानसि क आजार असतो का?
सुसाइडचा विचार करत असलेल्या व्यक्ती मदत मि ळवण्याचा प्रयत्न का करत नाहीत?
सुसाइडचा प्रयत्न केला म्हणजे ती व्यक्ती, स्वतःच्या समस्या सोडवण्यास भ्याड कि ं वा दबु ळी असल्याच े द्योतक आहे का?
सुसाइडचा विचार करणाऱ्याने मरण्याचा निश्चय केलेला असतो का?
सुसाइडचा प्रयत्न करणे भारतात अजूनही कायद्याने शिक्षापात्र आहे का?
तरूणांमधील सुसाइड रोखण्यासाठी मी काय करू शकते/शकतो?
नाही, सुसाइडविषयी बोलल्याने कोणाला स्वतःचा जीव घेण्यासाठी प्रोत्साहन मिळत नाही. सुसाइडचा विचार करणाऱ््ययाांना कदाचित कोणाशी बोलावे हे माहीत नसते किंव ा त््याांच्याबद्दल लोकांचे चुकीचे मत तयार होईल अशी त््याांना चिंता वाटते. त्याविषयी उघडपणे बोलल्याने एखाद्याला सुसाइड करण्यासाठी प्रोत्साहन मिळत नाही उलट आपल्या भावनांबद्दल मोकळेपणाने बोलण्यासाठी त््याांना मदत मिळते. अशा संव ादामुळे त्या व्यक््तीींना आपल्या निर््णयावर पुन्हा विचार करायला वेळ मिळतो आणि त्यायोगे सुसाइड टळू शकतो.
मानसिक आजार असलेले कित्येकजण सुसाइडचे विचार अनुभवत नाही, तसेच सुसाइडचा प्रयत्न करणारे किंव ा त्यामुळे मृत्यू आलेल्या सर््वाांना मानसिक आजार असतोच असे नाही. भारतामध्ये, नातेसंबंधांम ुळे येणारा ताण, सामाजिक-सांस्कृति क आणि आर्थिक घटक ही तरूणांच्या सुसाइडची मुख्य कारणे आहेत.
एखादी व्यक्ती सुसाइडचा विचार करत असेल तर त्याच्या मनात घोर निराशेची आणि असहायतेची भावना असण्याची शक्यता असल्याने, स्वतःहून मदत मिळवणे कदाचित त््याांच्यासाठी अशक्य होत असेल. त््याांना अशी भीती देखील वाटत असावी की जर त््याांनी मदत मागितली तर लोकांचे त््याांच्याबद्दल चुकीचे मत तयार होईल व ते त््याांचे अनुभव समजून घेऊ शकणार नाहीत. सुसाइडभोवती असलेले मौन आणि कलंक यांम ुळे मदत मिळवणे अधिकच कठीण होते. म्हणूनच, जेव्हा एखाद्या व्यक्तीमध्ये तुम्हाला धोक्याचे संकेत जाणवतात त्यावेळी त््याांना आधार देणे महत्त्वाचे ठरते.
सुसाइड करण्याचा विचार किंव ा हेतू मनात बाळगणे ही काही दुबळेपणाची वा कमकुवत असण्याची खूण नाही. तसा प्रयत्न करणारे फार मोठ्या तणावाखाली असतात व त््याांच्यासाठी कदाचित आधार आणि देखभालीची व्यवस्था उपलब्ध नसते. तसेच, स्वत:च्या तणावावर स्वत: ताबा ठेवण्यासाठी आवश्यक अशी साधने त््याांच्याकडे नसतात.
बहुतेककरून सुसाइडचा विचार करणाऱ््यया व्यक्तीच्या मनात जगावे की मरावे ह्याबद्दल अनिश्चितता असते. सुसाइड करण्याच्या विचारांचे दिसणारे संकेत, आत्यंति क भावनिक दुःख असल्याचे दर््शवतात. आपले आयुष्य संपवावे असा विचार करणाऱ््यया व्यक््तीींसाठी त््याांच्या दुःखद परिस्थितीतून बाहेर पडण्याचा मार््ग शोधणे अतिशय अवघड होत असावे. असे असूनही, जर पुरेसा आधार मिळाला तर सुसायडल भावनांव र ताबा मिळवून आपल्या समस््याांना तोंड देण्याचे मार््ग ते शोधून काढू शकतात. म्हणून, अशा व्यक््तीींना त््याांच्या विचारांनुसार वागण्यापासून रोखण्यासाठी योग्य वेळी योग्य आधार देणे महत्त्वाचे असते.
सुसाइडचा प्रयत्न हा शिक्षापात्र गुन्हा नाही. आपल्या देशाच्या मेेंटल हेल्थ केअर ऍक्ट (2017) नुसार तीव्र ताणामुळे के लेला सुसाइडचा प्रयत्न आता फौजदारी गुन्हा नाही. हा कायदा हे मान्य करतो की सुसाइडमुळे मृत्यू पावलेल्या किंव ा तसा प्रयत्न करणाऱ््यया व्यक्ती अत्यंत तणावाखाली असतात. ह्या कायद्यामध्ये सुसाइडचा प्रयत्न करणाऱ््ययाांसाठी निगा, उपचार आणि पुनर््वसन उपलब्ध करून देण्याची तरतूद देखील करण्यात आली आहे. ज््याांनी तीव्र तणावाखाली सुसाइडचा प्रयत्न केला आहे त््याांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई केली जाऊ शकत नाही.
कोणतीही व्यक्ती बदल घडवून आणू शकते व सुसाइड रोखण्यात आपले योगदान देऊ शकते. सुसायडल विचारांशी झगडणाऱ््यया व्यक््तीींना खाली दिलेल्या काही मार््गाांद्वारे आपण आधार देऊ शकतो:
धोक्याचे संकेत शिकून घ्या: तुमच्या प्रिय व्यक््तीींपैकी कोणी स्वत:च्या अशा विचारांशी झगडत असेल तर त््याांच्यात दिसणाऱ््यया कोणत्या संकेतांसाठी सतर््क राहावे हे कळण्यासाठी धोक्याचे संकेत आणि जोखिमीची कारणे (रिस्क फॅक्टर) तुम्ही शिकू शकता.
विचारा आणि ऐका: एखाद्या व्यक्तीला ते सुसाइडचा विचार करत आहेत का, हे विचारण्यासाठी आणि त्याचं म्हणणं ऐकू न घेण्यासाठी तुम्ही तज्ञ असण्याची आवश्यकता नाही. मदतीचा हात पुढे केल्याने संघर््ष करणाऱ््ययाांचा जीव वाचू शकतो आणि त््याांची आशा पल्लवित होऊ शकते.
आशादायक संदेश पसरवा: सुसाइड रोखली जाऊ शकते हे सांगणारे आणि उपलब्ध असलेल्या मदतीची माहिती देणारे संदेश शेयर करा.
उपयुक्त माहिती आणि साधने(रि सोर्सेस) शेयर करा: एखाद्या परिस्थितीत असहायता अनुभवणाऱ््ययाांना सक्षम करण्यासाठी त््याांना धोक्याचे संकेत आणि निवारक योजनांची माहिती देऊ शकता. तसेच उपलब्ध आधार सेवांची माहितीसुद्धा तुम्ही देऊ शकता.
तुमची आत्मकथा शेयर करा: सुसाइडच्या विचार आणि भावनांव र ताबा मिळविण्याचा तुमचा अनुभव तुम्ही शेयर करू शकता. त्यामुळे इतरांना आधार मिळवण्यासाठी स्वतःच्या भावना व विचार मुक्तपणे व्यक्त करण्याची प्रेरणा मिळेल.
स्वयंसेवेसाठी वेळ द्या: सुसाइड रोखण्याच्या आमच्या कामाला समर््थन देण्यासाठी, जागरूकता निर््ममाण करण्याच्या आणि सुसाइडशी निगडित कलंक मिटविण्याच्या कामात तुम्ही स्वयंसेवक होऊ शकता.
Feedback helps us improve our content and resources to make the experience better for everyone.