© 2023 आउटलिव | सेवा की शर्तें | गोपनीयता धोरण
स्वतःचे दुःख समजून घेणे व दु:खात असताना तुम्ही स्वतःला कसे आधार देऊ
सुसाइडमुळे आपल्या प्रिय व्यक्तीला गमावण्याचे दुःख फार मोठे असते. कोणाला गमावल्यानंतर शोक करणे ही एक नैसर्गिक प्रतिक्रिया आहे आणि तो अतिशय व्यक्तिगत अनुभव आहे. प्रत्येकाचा शोकाचा अनुभव हा वेगवेगळा असतो. तुम्हाला बऱ््ययाच तीव्र भावनांचा कदाचित अनुभव येऊ शकतो, जसे की मानसिक आघात, गोंधळून जाणे, राग, उदासी, अपराधीपणा, आणि शरम. सुसाइड या विषयाशी जोडलेल्या कलंकामुळे, सामाजिक आधार मिळत नाही आणि मग शोक करणेसुद्धा कठीण होऊन बसते.
लक्षात असू द्या की हे सर््व तुम्ही एकट्याने सहन करण्याची गरज नाही. कोणाला गमावून बसल्याचे तुमचे दुःख कोणीच पूर््ण पणे दूर करू शकणार नाही पण ते कमी करण्यासाठी मार््ग आहेत.
मृत्यूनंतर बराच काळ लोटल्यानंतरही - उफाळून वर येऊ शकतो. शोक करण्याचा कुठलाही मार््ग हा योग्य किंवा अयोग्य नसतो हे लक्षात ठेवणे उपयोगी पडते. तुम्हाला ज्या भावना, ज्या वेळी वाटत आहेत, त्या भावना त्या त्या वेळी अनुभवण्याची मुभा तुम्ही स्वतःला द्यायला हवी. त्या प्रत्येक भावनेचा अनुभव आणि अर््थ हा आपल्या प्रत्येकासाठी वेगवेगळा असू शकतो. तरी सुद्धा अशा तुमच्या भावना तुम्ही स्वतः जाणून घेणे आणि त्या लक्षात ठेवणे चांगले ठरू शकते, कारण जेव्हा कधी कठीण भावना उफाळून येऊ लागतात तेव्हा स्वतःला सावरणे सुकर होऊ शकते.
अपराधीपणा :
सुसाइड टाळू शकलो नाही म्हणून तुम्हाला अपराधीपणाची किंवा आपण अपयशी ठरल्याची अनुभवास येऊ शकते. ‘त््याांच्यात दिसणारे संकेत लवकर ओळखून मी काही उपाययोजना केली असती तर?’ असं कदाचित तुम्ही स्वतःला विचारत रहाल. त््याांच्या मृत्यूपूर्वीचे तुमचे शब्द किंवा तुम्ही केलेली एखादी गोष्ट यांसाठी कदाचित तुम्ही स्वतःला दोषी ठरवत असाल. खरं तर भविष्यात काय होईल ह्याचे भाकित कोणी करू शकत नाही आणि दुसऱ््ययाच्या कृत्याची सर््व कारणेही कोणाला कळू शकत नाहीत. आपल्या प्रिय व्यक्तीला गमावले असता, काही गोष्टी आपल्या नियंत्रणाबाहेर होत्या हे सत्य मान्य न करता त्याकरिता स्वतःला दोष देणे हा मनुष्यस्वभाव आहे.
धक्का (शॉक):
आपल्या प्रिय व्यक्तीच्या सुसाइडने तुम्हाला धक्का बसला असण्याची शक्यता आहे. कदाचित मृत्यूची दुःखद दृश्यं सतत तुमच्या डोळ््याांसमोर तरळत असतील. ह्या सगळ्याचा परिणाम तुमच्या शरीरावर - मळमळणे, दम लागणे, छातीत दुखणे व झोप न लागणे अशा स्वरूपात होऊ शकतो. सुसाइडने झालेल्या हानीला तोंड दिल्यानंतर जर अशी शारीरिक लक्षणं तुमच्यात बरेच दिवस दिसत राहिली तर डॉक्टर किंवा मानसिक आरोग्य तज्ञाचा सल्ला घेणे ठीक राहील.
अविश्वास :
आपल्या प्रिय व्यक्तीचा मृत्यु झाला आहे ह्याचा स्वीकार करणे कदाचित तुम्हाला खूप अवघड जात असेल. अनेकांच्या बाबतीत ही नैसर्गिक प्रतिक्रिया असते. जसा काळ जाईल व त््याांचा मृत्यू हा अधिक वास्तविक (रियल) होईल, तेव्हा त्या प्रतिक्रियेची तीव्रता, हळूहळू कमी होऊ लागेल.
सुन्न होणे :
कदाचित तुम्हाला कसलीही जाणीव होणार नाही, जसे काही तुम्ही पूर््णपणे सुन्न झाला आहात. काही जणांना, कोणाला गमावून बसण्याच्या दुःखाचा अनुभव जाणवायला काही काळ लागू शकतो.
हताश :
उदासी आणि नैराश्याच्या असह्य भावना, येणाऱ््यया पुढील काळात कदाचित वारंवार येत रहातील. उदासीचे आणि असहाय्यतेचे दडपण तुम्हाला जाणवू शकते. सुसाइडमुळे शोकाकुल झालेल्या लोकांना देखील सुसाइडचे विचार आणि भावना अनुभवास येऊ शकतात. जर तुम्हाला दिसलं की हे तुमच्या बाबतीत घडत आहे, तर मदत घेण्यासाठी हात पुढे करा. सद्य परिस्थितीत सुसाइड हा सुटकेचा एकमेव मार््ग आहे असे जरी तुम्हाला वाटत असले तरी, जीवनात आशेला जागा आहे आणि ह्या परिस्थितीतून तुम्ही बाहेर पडू शकता.
गोोंधळून जाणे : सुसाइडमुळे होणाऱ््यया शोकाचा सर््ववात कठीण पैलू म्हणजे तुमच्या प्रिय व्यक्तीने स्वतःचे जीवन का संपवले हे पूर््णपणे समजू न शकणे. ह्या प्रश्नाकडे कदाचित तुम्ही पुन्हा पुन्हा वळत असाल, पण तो प्रश्न तुमच्यासाठी अनुत्तरित रहात असेल. सहसा सुसाइड केली जाण्याची कारणे अतिशय गंतु ागंुतीची असतात व कु ठल्याही एकाच कारणामुळे सुसाइड कधीच केली जात नाही.
राग : इतक्या मोठ्या दुःखात तुम्हाला एकटं टाकून तुमची प्रिय व्यक्ती कायमची निघून गेली म्हणून तुम्हाला तिचा राग आला असेल. सुसाइड तुम्ही रोखू शकला नाहीत याकरिता देखील स्वतःचा आणि इतर कोणाचा राग सुद्धा आला असेल. ह्या भावना खूप गंतु ागंुतीच्या आणि निराश करणाऱ््यया असतात. एखाद्या व्यक्तीचा खूप राग आलेला असतानाही त््याांच्याबद्दल अतिशय प्रेमही वाटू शकते हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. झालेल्या हानीचे वास्तव स्वीकारण्यासाठी कधी कधी राग येणे गरजेचे असते.
शरम : आपल्या समाजात अजूनही सुसाइडशी जोडलेला कलंक टिकून असल्याने, तुम्ही शरमिंदा होत असाल. लोकं काय मत करून घेतील ह्या भितीने त््याांना काय सांगावे हे तुम्हाला कळत नसेल. ह्यामुळे तुमच्या शोकात आणखी भर पडू शकते. जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या भावनांना सामोरे जात आहात, तोपर्यंत विश्वासातील एखाद्या व्यक्तीच्या संपर््ककात राहून तुम्ही त््याांच्याशी बोलू शकता.
आपल्या प्रिय व्यक्तीच्या सुसाइडची तीव्र प्रतिक्रिया तुम्ही सतत अनुभवत असाल, उदाहरणार््थ वाईट स्वप्न पडणे, जुन्या आठवणी येणे, कुठल्याही कामात मन न लागणे, समाजापासून अलिप्त रहाणे. ह्या प्रतिक्रिया तुम्हाला निराश करू शकतात. असे जरी असले तरी तुम्ही अशा सर््व भावनांतून सुटण्याचा मार््ग काढू शकता. बहुतेक करून अशा भावना हळूहळू कमी होत जातात आणि काळ जाईल तसं तुम्हाला ह्या भावनांवर चांगल्याप्रकारे नियंत्रण ठेवता येऊ शकेल.
तुमची देखभाल करू शकणाऱ्या व्यक्ततींसोबत काही वेळ काढा
तुम्हाला कदाचित लोकांपासून दूर राहावेसे वाटत असेल पण लोकांकडून मिळणारे प्रेम, आधार आणि शोकसंदेश स्विकारण्यासाठी स्वतःला तयार ठेवणे महत्त्वाचे आहे. तुमच्या विश्वासातील अशा लोकांच्या संपर््ककात रहा, जे तुम्हाला गरज लागेल तेव्हा तुमचे म्हणणे ऐकण्यास तयार असतील. स्वतःच्या भावनांबद्दल कोणाशी तरी बोलण्याने तुम्हाला आलेली एकटेपणाची भावना कमी होईल. तुम्हाला कशाची गरज आहे हे लोकांना सांगायला कचरू नका.
व्यावसायिक (तज्ञ) आधार मिळवण्याचा प्रयत्न करा व्यावसायिक (तज्ञ) आधार मिळवण्याचा तुम्ही विचार करू शकता, जर
स्वतःला इजा करून घेण्याचा तुम्ही विचार करत आहात. सुसाइडमुळे शोकाकु ल झालेल्या लोकानं ा देखील ससु ाइडचे विचार आणि भावना अनुभवास येऊ शकतात. जर तुम्हाला दिसलं की हे तुमच्या बाबतीत घडत आहे, तर मदत घेण्यासाठी हात पुढे करा.
एक दिनक्रम (रुटीन) तयार करा
सुरवातीला, तुमचा शोकामुळे एक एक दिवस काढताना तुमची सर््व शक्ती खर््च होत असेल. अशा परिस्थितीत तुम्ही ‘करायला हव्यात’ अशा गोष्टी जर तुम्ही करू शकला नाहीत तरी ठीक आहे. शोकाकु ल असताना स्वतःची काळजी घेणे जास्त महत्वाचे आहे. तरीही पुन्हा दिनक्रम तयार के ला तर परिस्थिती पूर््वपदावर आल्यासारखे वाटून आशा निर््ममाण होते.
स्वतःच्या पद्धतीने शोक व्यक्त करा शोक व्यक्त करण्याची कोणतीही “योग्य पध््दत” नसते. तुमचे विचार आणि भावना, तुमच्या मनाला स्वाभाविक वाटतील अशा रितीने व्यक्त करा. ‘तुम्हाला काय वाटले पाहिजे’ आणि ‘तुम्ही काय विचार करायला हवा’ हे ऐकून जर तुम्हाला त्रास होत असेल तर असे सांगणाऱ््यया लोकांशी संपर््क कमी करा. तुमची इच्छा असेल तर तुमच्या भावनांविषयी इतरांना सांगू शकता किंवा तुम्ही त्या भावना खाजगीत व्यक्त करू शकता. जर तुम्हाला कोणाशी बोलावेसे वाटत नसेल तर शोक करण्याकरता दिवसातील काही वेळ वेगळा काढून बाजूला ठेवा. कोणत्याही प्रकारे, आपला अनुभव स्विकारलात तर त्याचा तुम्हाला उपयोगच होईल.
आपल्या आरोग्याची काळजी घ्या
शोकाच्या सुरवातीच्या टप्प्यात स्वतःच्या किमान गरजांकडे लक्ष देणेही कठिण असते. परंतु, त्यावेळी येणाऱ््यया भावनांना सामोरे जाण्यासाठी तुमच्या शरीराला ताकदीची आवश्यकता असते. म्हणून वेळोवेळी थोडे थोडे अन्न घ्या, शरीराला कार््यरत ठेवा, स्नान करा आणि पाणी पीत राहा.
स्वतःला वेळ द्या धीराने घ्या आणि स्वतःबद्दल दयेची भावना ठेवा.
तुमच्याकडून इतरांच्या असलेल्या अपेक््षाांनी विचलित होऊन कसलीही घाई करू नका. शोक एक प्रक्रिया असते आणि ती पूर््ण होण्यास वेळ लागतो. असह्य दुःखाचे अडथळे उभे राहिले आहेत असे अनुभव तुम्हाला येत रहातील - आणि ते ठीक आहे. आपली मनस्थिती बिघडवणारे ट््ररिगर (चेतक) (उदाहरणार््थ काही व्यक््तीींशी संपर््क, वाढदिवसासारखे खास प्रसंग) समजून घेऊन त््याांना सामोरे जाण्याचे मार््ग (उदाहरणार््थ संपर््क कमी करणे, रिलॅक्सेशन करणे) तुम््हाांला शोधता येतील.
आपल्या प्रिय व्यक्तीचे स्मरण करण्यासाठी संधी निर््ममा ण करा तुम्ही आता तयार आहात असे तुम्हाला वाटेल तेव्हा गेलेल्या प्रिय व्यक्तीचे स्मरण करण्यासाठी काही आयोजन करा. सामुदायिक श्रद््धाांजलीमध्ये तुम्ही भाग घेण्याची आवश्यकता नाही. तुम्ही हे करू शकता:
त््याांच्या आठवणींची डायरी लिहा. ते असताना दोघांनी मिळून आनंदाने केलेल्या गोष्टी आताही करत रहा.
Feedback helps us improve our content and resources to make the experience better for everyone.