© 2023 आउटलिव | सेवा की शर्तें | गोपनीयता धोरण
आउटलिवच्या पियर सपोर्ट प्रोग्रॅमद्वारे सुसाईड प्रतिबंधात्मक पियर सपोर्ट तरुणांपर्यंत परिणामकारकरीत्या पोहोचवण्याचे उद्दिष्ट्य सध्या करता येईल. आम्ही दिल्ली, मुंबई व पुण्यामधील तरुण पियर सपोर्टर्सचा असा एक गट तयार करत आहोत जे तणावग्रस्त किंवा नैराश्य आलेल्या तरुणांना चॅटद्वारे भावनिक आधार देऊ शकतील. आउटलिव मधील पियर सपोर्टरर्सना आमच्या पियर मेंटॉर्स कडून गटकार्याद्वारे व वैयक्तिक मार्गदर्शन मिळते.
आउटलिव पियर सपोर्टर म्हणून तुम्ही तरुणांमधील सुसाईड प्रतिबंधात्मक कार्यात मदत करू शकता आणि बदल घडवून आणू शकता!
आउटलिव साठी पियर सपोर्टर होण्यासाठी मानसिक आरोग्यसंदर्भात किंवा सुसाईड प्रतीबंधाबाबत काही पार्श्वभूमी किंवा शिक्षण असणे गरजेचे नाही.
आम्ही अशा तरुणांच्या शोधात आहोत जे:
जर तुम्हाला तरुणांमधील सुसाईड प्रतिबंधासाठी काम करायची इच्छा असेल तर आउटलिव पियर सपोर्टर होण्यासाठी आजच अर्ज करा!
आउटलिव पियर सपोर्टर बनण्यासाठी तुम्हाला निवड प्रक्रियेचे 2 टप्पे पार पडावे लागतील
निवड झालेल्या तरुणांना सुसाईड प्रतिबंधात्मक 30 तासांचे पियर सपोर्टर बनण्याचे प्रशिक्षण दिले जाईल आणि त्यानंतर त्यांचे आउटलिव मध्ये पियर सपोर्टर म्हणून स्वागत होईल!
नैराश्याने ग्रस्त, सुसाईड चे विचार येत असलेल्या तरुणांना भावनिक आधार देण्याचे प्रशिक्षण आउटलिव पियर सपोर्टर्सना ऑनलाईन किंवा हायब्रीड स्वरूपात दिले जाईल. हे ट्रेनिंग संपले की पियर सपोर्टर्सने 3 महिन्यांसाठी प्रत्येक आठवडा 7 तास काम करणे अपेक्षित आहे (वेळ दुपारी 3 ते रात्री 12 मध्ये कधीही). आउटलिव चॅटद्वारे ऑनलाईन मदत पुरवणे असे कामाचे स्वरूप असेल. पियर सपोर्टर्सना पियर मेंटॉर्स कडून नियमित मार्गदर्शन व मदतसुद्धा मिळेल.
आउटलिव पियर सपोर्ट प्रोग्रॅमचे सर्व सदस्य हे स्वयंसेवक असतील. सर्व सदस्य आउटलिव मध्ये स्वयंसेवक म्हणून काम करतात व ह्यासाठी कुठलेही शुल्क दिले जात नाहीत. आमचे 30 तासाचे पियर सपोर्ट ट्रेनिंग हे मोफत आहे आणि ते पूर्ण केल्याबद्दल सर्व पियर सपोर्टर्सना त्याचे प्रमाणपत्र मिळेल.
आउटलिव पियर सपोर्टर म्हणून पुढील ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. ह्यासाठी कुठलाही मर्यादित कालावधी नाही. अधिक माहितीसाठी संपर्क करा: [email protected].
अभिप्राय आम्हाला आमची सामग्री आणि संसाधने सुधारण्यात मदत करतो जेणेकरून प्रत्येकासाठी अनुभव अधिक चांगला होईल.