© 2023 आउटलिव | सेवा की शर्तें | गोपनीयता धोरण
ऑनलाईन किंवा सोशल मीडिया वर सुसाइड बद्दल सुरक्षित पद्धतीने संभाषण होईल असा पुरावा दर्शवणारे घटक व माहितीचा वापर
तुमच्या पोस्टचा लोकांवर काय परि णाम होईल ह्याचा विचार करा:
आधार सेवांची अचूक माहि ती देऊन मदत मिळवण्याच्या सवयीला प्रोत्साहन द्या:
ट्रिगर वॉर््नििंगचा (चेतक इशाऱ्याचा) समावेश करा :
केवळ अचूक आणि पडताळणी होऊ शकेल (व्हेरि फायेबल) अशी माहि ती पोस्ट करा:
कलंक कमी करणारी, सर््वसामान्यपणे आढळणार े मिथक आणि गरै समज दरू करणारी माहि ती पुरवा :
सुसाइड झालेल्या ठिकाणाची कि ं वा पद्धतीींची सविस्तर माहि ती देऊ नका:
सुसाइडच्या विचार आणि भावनांवर मात करण्याविषयी आशादायी कथा आणि कथानकं शेयर करा:
ज्या व्यक्तीबद्दल तुम्ही बोलत आहात त््याांची गोपनीयता राखली जाईल याची खात्री करा:
तुमच्या पोस्टसाठी येणाऱ्या कमेेंट््सवर नि यमितपणे लक्ष ठेवा (मॉनि टर करा):
संवेदनशील भाषा वापरा:
सुसाइडसंबंधी काहीही पोस्ट करण्याआधी विचार करण्यासाठी थोडा वेळ घ्या -
a. ही पोस्ट तुम्हाला का शेयर करायची आहे? सुसाइडसंबंधी तुम्हाला जागरूकता वाढवायची आहे का? तुम्ही मदतीच्या शोधात आहात का? सुसाइडमुळे गमावलेल्या व्यक्तीचे तुम्हाला गौरवपूर््ण स्मरण करायचे आहे का?
b. ह्या पोस्टचा लोकांवर काय परिणाम होईल? (उदाहरणार््थ, सुसाइड करू शकतील असा धोका असलेले, सुसाइडमुळे शोकमग्न असलेली कु टंुब ेकिंवा मित्र अथवा सुसाइडचा प्रयत्न केलेली व्यक्ती) त््याांना यातना होतील की आधार मिळेल?
c. तुम्ही शेयर करत असलेली माहिती वाचकासाठी किंवा बघणाऱ््ययासाठी अधिक सुरक्षित आणिउपयुक्त व्हावी ह्यासाठी ती शेयर करण्याचा काही वेगळा मार््ग आहे का?
d. ही पोस्ट कोणाकोणापर्यंत पोचू शकते? जर तुमचं अकाउंट ‘प्रायव्हेट’ नसेल तर तुम्ही पोस्ट करत असलेल्या कन्टेन्ट पर्यंत कोणीही पोचू शकते. तुमच्या पोस्टसाठी कदाचित सकारात्मक आणि नकारात्मक अशा मिश्र प्रतिक्रिया मिळतील.
e. ही पोस्ट शेयर केल्याने तुम्हाला कसं वाटेल?
सुसाइड निवारण हेल्पलाईनसारख्या एखाद्या आधार सेवेबद्दल माहिती किंवा लिंक तुमच्या पोस्टमध्ये देणे महत्त्वाचे आहे. जेणेकरून तुमची पोस्ट बघणाऱ््ययाांना जर त््याांना काही मनस्ताप झाला तर मदत कुठे मिळू शकते हे कळेल.
तुमच्या पोस्टमध्ये कन्टेन्ट /ट््ररिगर वॉर्ननिंग देण्याचा विचार तुम्ही करायला हवा. (उदाहरणार््थ: “TW: ह्या पोस्टमध्ये सुसाइडविषयी कन्टेन्ट आहे”). त्यामुळे पोस्ट बघणाऱ््ययाांना त्या पोस्टमध्ये क्लेशदायक कन्टेन्ट आहे असा इशारा मिळेल आणि सावध राहून तुमची पोस्ट वाचावी की नाही हा निर््णय घेण्यात त््याांना मदत होईल.
तुम्हाला ज्या माहितीविषयी खात्री नाही अशी कोणतीही माहिती शेयर करणे टाळा. कोणत्यातरी एकाच कारणाने सुसाइड होतात ही कल्पना रुजवू नका (उदाहरणार््थ: नोकरी जाणे, परीक्षेतील अपयश, ब्करे -अप इत्यादी). अनेक गंतु ागंुतीच्या गोष्टी एकत्र आल्या तर त्याचा परिणाम म्हणून सुसाइड होतात. म्हणून एखाद्या सुसाइडच्या कारणांविषयी अंदाज बांधणे टाळायला हवे. बाहेरच्या माहितीचे कोणतेही स्रोत (एक्सटर््नल सोर््स) लिंक शेयर करण्याआधी पुरेपूर काळजी घेऊन ती अचूक असल्याची खात्री करून घ्या. आरोग्य संशोधन संस््थाांकडून पडताळणी झालेली आणि प्रमाणित माहिती देणारे विश्वासार््ह माहिती स्रोतच (सोर््स) शेयर करा.
सुसाइड रोखल्या जाऊ शकतात आणि त्यासाठी मदत उपलब्ध आहे ह्या गोष््टीींवर भर देणे महत्वाचे आहे. सर््वसाधारण मिथके आणि त््याांच्या बाबतीतली वस्तुस्थिती तुम्ही शेयर करू शकता. (उदाहरणार््थ: वस्तुस्थिती - सुसाइडविषयी बोलल्याने सुसाइड होत नाही किंवा त्यामुळे प्रोत्साहन मिळत नाही)
ज्यातून सुसाइडचे ठिकाण किंवा पद्धती समजून येत आहेत अशी चित्र किंवा कन्टेन्ट शेयर करू नका. त्यामुळे एखादी शोक करणारी व्यक्ती अस्वस्थ होऊ शकते आणि धोक्यात असलेल्या इतरांकडून नक्कल (कॉपीकॅट सुसाइड *) म्हणून सुसाइड केली जाऊ शकते. एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीचा मृत्यू जर सुसाइडने झाला असेल तर असं होण्याची शक्यताजास्त असते म्हणून त्याबाबत बोलताना अतिशय खबरदारी घ्यायला हवी.
* कॉपीकॅट सुसाइड म्हणजे इतर कोणाच्या सुसाइड करण्याच्या पद्धतीची नक्कल करून सुसाइड करण्याचे प्रयत्न करणे.
तुमचा किंवा इतरांचा अनुभव शेयर करताना, त्यातील लवकर मदत आणि आधार मिळवण्याचे महत्व पटवून देणाऱ््यया भागावर भर देणे उपयुक्त ठरते. तुम्हाला किंवा इतर कोणाला, सुसाइडच्या विचार आणि भावनांना सामोरे जाण्यासाठी मदत केलेल्या व्यक्ती किंवा उपक्रमांबद्दल तुम्ही बोलू शकता.
दुसऱ््यया कोणाबद्दल कोणतीही माहिती शेयर करण्याआधी त््याांची परवानगी घ्या. सुसाइडने मृत्यू झालेल्या व्यक्तीबद्दल तुम्ही काही सांगत असाल तर त््याांच्यासाठी शोकाकुल असलेल््याांच्या (उदाहरणार््थ: त््याांचे कु टंुबीय) भावनाचं ा संवेदनशीलतने े विचार करा आणि त््याांच्या गोपनीयतेचे उल्लंघन करू नका.
तुमच्या पोस्टवर प्रतिक्रिया म्हणून होणाऱ््यया घडामोडीवर लक्ष ठेवण्याने मदत होऊ शकते. असुरक्षित किंवा धोकादायक कन्टेन्ट जसं की सुसाइडची दृश्यं, साधनं/पद्धती किंवा सुसाइड नोट इत्यादी गोष्टी पोस्ट करू नका. जर तुम्हाला एखादी असुरक्षित किं वा ट््ररिगर करणारी प्रतिक्रिया दिसून आली तर तुम्ही:
सुसाइडला खळबळजनक, सर््वसाधारण किंवा अतिशय सोपे असे रूप भासवणारी भाषा वापरू नका.
उपयोगी न ठरणारी भाषा आणि कन्टेन्ट /हे करू नका | उपयुक्त ठरणारी भाषा आणि कन्टेन्ट /हे करा |
---|---|
आत्महत्या केली असं म्हणू नका कारण त्यामुळे सुसाइड हा गुन्हा किंवा पाप असल्याचा अर््थ निघतो. | “सुसाइडमुळे मृत्यू झाला”, “स्वतःचा जीव घेतला”, “स्वतःचे जीवन संपविले” किंवा “सुसाइडचा प्रयत्न केला” अशा वाक््याांचा वापर करा. |
सुसाइड संकटांवर तोडगा आहे असे म्हणू नका. | आशादायक आणि सुधारणा झाल्याच्या (बरे होण्याच्या) संदेशांचा समावेश करा (उदाहरणार््थ: सुसाइडच्या विचारांतून बाहेर आलेल्या व्यक््तीींचे व्हिडिओ किंवा कथांच्या लिंक्स पोस्ट करा). |
लक्ष वेधून घेण्यासाठी खळबळजनक हेडलाईन्स किंवा चित्र वापरून सुसाइडचे गांभीर््य कमी करू नका. | धक्कादायक किंवा त्रासदायक ठरणार नाही अशी साधी सोपी भाषा वापरा. |
सुसाइडकरता कोणत्याही एका घटनेला दोषी ठरवू नका. | सुसाइड ही गंतु ागंुतीची असते आणि अनेक कारणे एकत्र आल्याकारणाने एखादी व्यक्ती तिचे आयुष्य संपवते ह्यावर जोर द्या. |
टीका करणारे (मत बनवणारे) शब्द वापरू नका जसे की भेकड, स्वार्थी, लक्ष वेधून घेणारा, मूर््ख, वेडा, कमकु वत आणि अपयशी. | सुसाइडपासून वाचवणाऱ््यया गोष््टीींबद्दल माहितीचा किंवा बरे होण्याबद्दलच्या गोष्टी समावेश करा (उदाहरणार््थ: लवकर मदत मिळवण,े अर््थपर््णू नात््याांमध् ये गंतु वनू घणे ) |
सुसाइडचे ठिकाण किंवा पद्धतीची माहिती देऊ नका. | मदत उपलब्ध आहे हे अधोरेखित करा आणि आधार सेवांची माहिती द्या. |
सुसाइड योग्य आहे असे दाखवणारे शब्द जसे की सुटका (मुक्तता), शांत होणे, यशस्वी, फसलेला प्रयत्न, शूर इत्यादी वापरू नका. |
संदर््भ:
1. चॅटसेफ: अ यंग पर््सनस् गाईड फॉर कम्युनि केटिंग सेफली ऑनलाईन अबाऊट सुसाइड (ओरिजन)
2. मिडिया गाईडलाईन्स फॉर रिपोर्टटींग सुसाइड (SPIRIT)
Feedback helps us improve our content and resources to make the experience better for everyone.